By  
on  

श्रेयस आणि प्रार्थनाने अशी केली शीर्षक गीताची तयारी, पाहा डान्स रिहर्सलचा व्हिडीओ

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे कलाकार झळकतायत. तब्बल 17 वर्षांनी श्रेयस मराठी टेलिव्हिजनवर झळकतोय तर प्रार्थनाने या मालिकेतून मराठी टेलिव्हिजन डेब्यू केलाय. नुकतीच ही मालिका प्रसारीत झाली असून मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय.

नुकतच मालिकेचं शीर्षक गीत प्रदर्शित करण्यात आलय. मालिकेच्या प्रदर्शनाआधी या शीर्षक गीताने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतय. शिवाय या गाण्यात प्रार्थना आणि श्रेयसचा खास परफॉर्मन्सही पाहायला मिळतोय. एखाद्या चित्रपटाच्या गाण्याप्रमाणे हे गाणं चित्रीत करण्यात आलय. 

 

प्रार्थनाने याच गाण्याच्या रिहर्सलचा व्हिडीओ शेयर केलाय. या व्हिडीओत प्रार्थना आणि श्रेयस डान्सचा सराव करताना पाहायला मिळत आहेत.

श्रेयस आणि प्रार्थना या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकतायत. त्यामुळे ही जोडी लक्षवेधी ठरतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive