'रंग माझा वेगळा' या मालिकेची कहाणी आता वेगळ्या वळणावर असल्याचं पाहायला मिळतय. दीपाला दोन कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर दीपाचं एक बाळ सौंदर्या इनामदारने तिची आठवण म्हणून स्वत:जवळ ठेवून घेतलं. तर दुसरं बाळ घेऊन दीपा सगळ्यांपासून दूर निघून गेली. या सगळ्यात दीपाचं एक बाळ तिच्यापासून दुरावलं असलं तरी ते सौंदर्या इनामदारच्या घरात कार्तिक जवळ म्हणजे आपल्या वडिलांकडे आहे.
या सगळ्यात दीपा तिच्याजवळ असलेल्या बाळाचं तर सौंदर्या दीपाच्या दुसऱ्या बाळाचं बारसं करण्याचं ठरवतात. यावेळी या गोंडस बाळांचं नामकरण करण्यात आलं. दीपाने तिच्या मुलीचं नाव कार्तिकी ठेवलं तर सौंदर्या जवळ असलेल्या मुलीचं नाव दिपीका असं ठेवण्यात आलं.
या सगळ्यात दीपाला तिच्या दुसऱ्या बाळाविषयी काही कळेल का ? आपलं बाळ जिवंत असून ते सौंदर्या इनामदारांच्या घरात आहे हे कळल्यावर काय असेल दीपाची प्रतिक्रिया ? आणि इनामदारांच्या घरी असलेल्या दुसऱ्या बाळाचा वडील कार्तिकच आहे याची जाणीव कार्तिकला होईल का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहेत. तेव्हा रंग माझा वेगळा मालिकेचे पुढील भाग पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.