By  
on  

पाहा Photos : 'बाळूमामा' फेम सुमित पुसावळेचे हे फोटो पाहिलेत का ?

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलय. बाळूमामांची गाथा या मालिकेतून पाहायला मिळते. म्हणूनच प्रेक्षक न विसरता ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून न विसरता पाहतात. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली सोबतच बाळूमामाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता सुमित पुसावळे देखील प्रेक्षकांसाठी लक्षवेधी ठरलाय. 

सुमितचा सोशल मिडीयावरही मोठा चाहतावर्ग निर्माण झालाय. मालिकेसाठी मिळणारं भरभरुन प्रेम तर आहेच शिवाय सोशल मिडीयावरही सुमितला प्रेक्षकांचं प्रेम मिळतय. यातच सुमित त्याच्या विविध पोस्ट सोशल मिडीयावर करताना दिसतोय. त्याने नुकतेच शेयर केलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

सुमितने पांढऱ्या रंगाच्या हुडी घातलेले फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये सुमितचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. चाहत्यांनीही त्याच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केलाय. शिवाय मोठ्या प्रमाणात कमेंट्सही मिळाले आहेत.

सोशल मिडीयावर सुमितने पोस्ट केलेले फोटोशुट कायम लक्षवेधी ठरताना दिसतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive