By  
on  

बिग बॉस मराठी 3 मध्ये जाणार असल्याच्या अफवांमुळे या अभिनेत्याला मिळत नाहीय काम

बिग बॉस हा कार्यक्रम कायम चर्चेचा विषय असतो. मग यात स्पर्धक कोण असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. गेल्या काही वर्षांपासून बिग बॉस मराठीही तितकच चर्चेत राहिलय. मोठ्या कालावधीनंतर आता बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरु होतय. यंदा या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून कोण दिसणार याची उत्सुकता असतानाच आता काही संभाव्य स्पर्धकांची नावं समोर येऊ लागली आहेत.

यात एका अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे. अभिनेता संग्राम समेळ यंदाच्या सिझनमध्ये बिग बॉस मराठीच्या घरात जाणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मात्र संग्राम हा बिग बॉसच्या घरात जात नसल्याचं त्याने स्पष्ट केलय. असं असतानाही या अफवांमुळे संग्रामला नाहक त्रास सहन करावा लागतोय.

एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत संग्रामने ही खंत व्यक्त केली आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनमध्ये संग्राम जात असल्याच्या अफवा सुरु झाल्याने त्याला काम मिळत नसल्याचं त्याने या मुलाखतीत सांगितलय. काहींनी तर या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या अंतीम यादीत त्याचं नाव सहभागी करून घेतलय. याचा फटका संग्रामला बसतोय. संग्राम यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून जाणार असल्याच्या अफवांवर अनेकांनी विश्वास ठेवून त्याच्या कामावर गदा आलीय. त्यामुळे संग्रामने या मुलाखतीत तो बिग बॉस मराठी 3 मध्ये जात नसल्याचं स्पष्ट करत या अफवांना पूर्णविराम दिलाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive