पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मालिकेचे 500 भाग पूर्ण झाल्याचं कलाकारांनी केलं सेलिब्रेशन

By  
on  

'रंग माझा वेगळा' ही मालिका गेल्या काही वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. याच प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने तब्बल 500 भाग नुकतेच पूर्ण केले आहेत. या निमित्ताने मालिकेच्या सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलय.

या मालिकेचा विषय, विविध पात्र आणि संकल्पना या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आणि प्रेक्षकांनी आत्तापर्यंत या मालिकेवर भरपुर प्रेम केलं. प्रेक्षकांच्या मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे या मालिकेने 500 भागांचा टप्पा पार केलाय. म्हणूनच मालिकेच्या सेटवर कलाकार, तंत्रज्ञ मिळून खास हा दिवस साजरा केला आहे.

यावेळी मालिकेतील काही कलाकारांनी 'रंग माझा वेगळा' असं मालिकेचं नाव लिहीलेले टीशर्ट परिधान केले होते. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होते. कार्तिकची भूमिका साकारणार अभिनेता आशुतोष गोखले, दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे, श्वेताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भगरे तर आदित्यची भूमिका साकारणार अंबर या सगळ्यांनी मिळून यावेळी खास फोटोही क्लिक केले आहेत.

या मालिकेने 500 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Recommended

Loading...
Share