By  
on  

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेच्या निमित्ताने चिन्मय मांडलेकरची आळंदीला भेट

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या 725व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाची जीवनगाथा सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे. आजपासून म्हणजेच 27 सप्टेंबरपासून 'ज्ञानेश्वर माउली' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते आणि मालिकेचे निर्माते चिन्मय मांडलेकर यांनी आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतलय. यावेळचे चिन्मयचे काही फोटो नुकतेच समोर आले आहेत.

 महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे.या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा  उलगडणार आहे. चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून दिग्पाल या मालिकेचे दिग्दर्शन देखील करत आहे.

भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive