'चला हवा येऊ द्या' शोला या अभिनेत्याचा रामराम, झळकणार हिंदी कार्यक्रमात

By  
on  

'चला हवा येऊ द्या' या प्रसिद्ध लोकप्रिय कॉमेडी शोचे असंख्य चाहते आहेत. या कार्यक्रमातील कलाकारांचे एकापेक्षा एक कॉमेडी परफॉर्मन्स प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील एक कलाकार मात्र काही एपिसोडमध्ये गैरहजर दिसतोय. त्याचं कारणही नुकतच समोर आलय.

हा कलाकार म्हणजे कृष्णा घोंगे. गेल्या काही भागात कृष्णा दिसला नव्हता. चला हवा येऊ द्या मधील गुंठामंत्री म्हणून कृष्णाची ओळख आहे. कृष्णाच्या गैरहजेरीमुळे त्याने हा कार्यक्रम सोडला की काय अशा चर्चा होत्या. मात्र तो या कार्यक्रम का दिसला नाही यांचं कारण आता स्पष्ट झालय. तर कृष्णाने या कार्यक्रमाला रामराम केला असून तो एका हिंदी कार्यक्रमात झळकणार आहे.

 

कृष्णा आता झी कॉमेडी शो या हिंदी कार्यक्रमाचा भाग बनला आहे. सोशल मिडीयावर त्याने काही फोटो शेयर केले आहेत. ज्यावरुन याची माहिती समोर आली आहे. बॉलीवुड अभिनेता प्रतीक गांधी नुकताच झी कॉमेडी शोच्या मंचावर प्रमोशनसाठी आला होता. त्यावेळी कृष्णाने त्याच्यासोबत फोटो क्लिक करून तो सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

 

डॉ. निलेश साबळे यांचा असिस्टंट म्हणून काम करत पुढे चला हवा येऊ द्या कार्यक्रमात काही भूमिका साकारून कृष्णाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता हिंदी कार्यक्रमात कृष्णा काय कमाल करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share