पाहा Photos : भाऊबीजेच्या निमित्ताने 'बिग बॉस मराठी 3' स्पर्धकांचे भावा-बहिणींसोबतचे खास क्षण

By  
on  

भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ-बहिणीचं नातं साजरं केलं जातय. यात मनोरंजन विश्वातील कलाकारही हा सण उत्साहात साजरा करत आहेत. सध्या बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन सुरु आहे. हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात असल्याने त्या घरातच सगळे सण, उत्सव साजरे करत आहेत. भाऊबीजेच्या निमित्ताने या स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबासोबत हा सण साजरा करता येत नाहीये. 

मात्र सोशल मिडीयावर या स्पर्धकांच्या दिवाळीच्या काही आठवणी पाहायला मिळत आहेत. शिवाय त्यांच्या भाऊबीजेचे फोटोही समोर आले आहेत. बिग बॉस मराठी 3 च्या स्पर्धकांचे त्यांच्या भाऊ-बहिणीसोबतचे फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.

 

मीनल शाहचा तिच्या भावासोबतचा फोटो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतोय.

तर विशाल निकमचे त्याच्या बहिणींसोबतचे भाऊबीज साजरा करतानाचे जुने फोटो पाहायला मिळत आहेत. 

याशिवाय स्नेहा वाघ, सोनाली पाटील या स्पर्धकांचेही त्यांच्या भावा-बहिणींसोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करण्यात आलेत.

Recommended

Loading...
Share