पाहा Photos : जयदीप - गौरीला लागणार हळद, लवकरच पार पडणार लग्नसोहळा

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळतय. लवकरच जयदीप आणि गौरीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेत विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळतेय.

लवकरच जयदीप आणि गौरीला हळद लागणार आहे. तेव्हा या खास भागाचे काही फोटो नुकतेच समोर आले आहेत. हळदी समारंभाचे चित्रीकरणादरम्यानचे हे फोटो सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत.

जयदीप आणि गौरीच्या हळदी कार्यक्रमाचे हे फोटो आहेत. तेव्हा दोघांचा लग्नसोहळा कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जयदीप - गौरीच्या लग्नसोहळ्यात शालिनी वहिनी काही विघ्न तर आणणार नाही ना ? या आणि बऱ्याच गोष्टी या मालिकेच्या आगामी भागात समोर येणार आहेत. 

Recommended

Loading...
Share