By  
on  

'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांनी अशी केली नवीन वर्षाची सुरुवात

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन करतोय. या कार्यक्रमातील कलाकार आणि त्यांची कॉमेडी ही महाराष्ट्राला पोटधरुन हसवतेय. नव्या वर्षातही असच काहीसं होणार आहे. 

नव्या वर्षाची सुरुवात या कलाकारांनी 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावरच केली आहे. तेव्हा नव्या भागांसह हे कलाकार धमाल उडवणार आहे एवढं नक्की. कॉमेडी क्विन म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रेया बुगडेने नुकतच या कार्यक्रमाच्या सेटवरील धमाल सेल्फि फोटो शेयर केले आहेत. या सेल्फित सगळे विनोदवीर पाहायला मिळत आहेत.

यासह लिहीलय की, "कामाचा पहिला दिवस  २०२२ तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हसऱ्या शुभेच्छा काही हसऱ्या चेहेऱ्यांकडून" 

तेव्हा या हसऱ्या चेहऱ्यांकडून हसऱ्या शुभेच्छा देत या विनोदवीरांनी त्यांचा नवीन वर्षातील कामाचा पहिला दिवस चांगलाच मजेशीर घालवल्याचं पाहायला मिळतय. या विनोदवीरांचे हे धमाकेदार एपिसोड 'चला हवा येऊ द्या' च्या आगामी भागात पाहायला मिळतीलच.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive