By  
on  

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येणार पुष्पा ?

साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटांने प्रेक्षकांना जणू वेड लावलय. या चित्रपटाची गाणी, डायलॉग हे सर्वत्र लोकप्रिय ठरले आहेत. सोशल मिडीयावर तर या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आणि गाण्यांवरील व्हिडीओ चर्चेत आहेत. यातच मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारही या गाण्यांवर, डायलॉगवर व्हिडीओ करताना दिसत आहेत.

पुष्पा चित्रपटाची लोकप्रियता पाहता आता चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात या चित्रपटावर खास स्किट पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात लवकरच हा स्पेशल परफॉर्मन्स पाहायला मिळेल. आता पुष्पा चित्रपट म्हटला तर मंचावर पुष्पा येणारच ना. तर चला हवा येऊ द्याच्या मंचावर येणार आहे पुष्पा.

 

हा पुष्पा दुसरा तिसरा कुणी नसून स्वत: भाऊ कदम पुष्पाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यासाठी भाऊ कदम यांनी पुष्पाचा लुकही केलाय. पुष्पाचा लुक केल्यावर ते डायलॉगही पाहायला मिळणार यात शंका नाही. डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी सोशल मिडीयावर पुष्पाच्या लुकमधील फोटो शेयर करत आगामी एपिसोडविषयीची उत्सुकता निर्माण केली आहे.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील विनोदवीर या भागात काय धमाल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive