By  
on  

पाहा Video : 'चला हवा येऊ द्या' फेम ही अभिनेत्री म्हणते ,"30 मुलांनी दिला होता लग्नासाठी नकार"

हे तर काहीच नाही या कार्यक्रमातून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील अतरंगी किस्से सांगतात. नुकतच कॉमेडीसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्नेहल शिदमनेही तिच्या आयुष्यातील अतरंगी किस्सा शेयर केलाय. स्नेहलने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मात्र खऱ्या आयुष्यात स्नेहला नकाराचा सामना कसा करावा लागला याविषयी ती या कार्यक्रमात बोलताना आणि त्यावर कॉमेडी करताना दिसली.

स्नेहल म्हटली की, "आमच्या घरात लग्नाचं वातावरण सुरु होतं. माझ्या बिहीणींची लग्नही झाली होती. त्यामुळे मीही लग्न करावं असा हट्ट सगळ्यांनी केला. मग मी सुद्धा लग्नासाठी तयार झाले. पण नावनोंदणी मी नाही करणार अस कटाक्षाने सांगितलं. त्याच्यानंतर जवळपास 30 च्या आसपास मुलांना माझे फोटो पाठवण्यात आले. त्यामुळे एकतरी मुलगा हो बोलेल आणि मी लग्न करुन सेटल होईल असं मला वाटलं होतं. पण या तिसही मुलांनी मला नकार दिला."

या किस्स्याविषयी सांगताना स्नेहल पुढे म्हणते की, "माझ्यात इतकं काय वाईट आहे की 30 पोरं एकाच वेळी नकार देतात. बरं त्यातील काही मुलं तर माझ्यापेक्षा छपरी होती." हा किस्सा सांगत स्नेहलने उपस्थित सगळ्यांना पोटधरुन हसवलं.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive