'रंग माझा वेगळा' या मालिकेत एक खास एपिसोड लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकीकडे दीपाने कार्तिकीचा सांभाळ एकटीने केलाय. कार्तिक हे तिचे वडील आहेत हे देखील कार्तिकीला माहिती नाहीय. यातच कार्तिकीसमोर सगळं सत्य समोर येणार असल्याचं नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतय.
एका टेम्पोच्या अपघातात कार्तिकीला इजा होते. या अपघातातून कार्तिक तिचा बचाव करतो आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात येते. यातच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कार्तिकीसमोरच दीपा आणि कार्तिक भांडू लागतात. त्यांच्या भूतकाळाविषयी एकमेकांना प्रश्न विचारु लागतात. यादरम्यान कार्तिकीला जाग येते आणि ती त्यांचे बोलणे ऐकते. या सगळ्यात हे सत्य कार्तिकीच्या समोर येणार का ? कार्तिक हे तिचे वडील आहेत हे कार्तिकीला कळेल का ? या प्रश्नांची उत्तरं या खास भागात पाहायला मिळतील.
एकीकडे कार्तिकी आणि दीपिका यांच्यात घट्ट मैत्री झाली आहे. यातच कार्तिक आणि दीपाच्या नात्यातील सत्य समोर आलं तर पुढे या मालिकेला काय वेगळं वळण मिळतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.