'अजूनही बरसात आहे' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या जोडीने टेलिव्हिजनवर एकत्र येऊन प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेतील अनोखी कहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली. उमेश - प्रियाची जोडी, त्यांचा रोमँटिक अंदाज हा चांगलाच चर्चेत ठरला. या मालिकेतील प्रत्येक भूमिका ही घराघरात पोहोचली.
या मालिकेने निरोप घेतल्यानंतर आता या मालिकेचं दुसरं पर्व येणार असल्याची घोषणा सोनी मराठीने नुकतीच सोशल मिडीयावर केली आहे. एवढच नाही तर येत्या 31 एप्रिलपासून हे नवं पर्व सुरु होणार असल्याचं सांगितलय. ही पोस्ट पाहून या मालिकेच्या चाहत्यांना तर आनंदाची बातमी मिळाली असं वाटलं पण जेव्हा तारखेकडे नीट नजर गेली तेव्हा लक्षात आलं.
पण ही पोस्ट 1 एप्रिल रोजी केल्याने नेटकऱ्यांनी एप्रिल फूलच्या कमेंट्स मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. तेव्हा हा एप्रिल फूल तर नाही ना अशी शंका अनेकांना आली. मग काहींचं लक्ष 31 एप्रिल या तारखेकडे गेलं तेव्हा मात्र ही गंमत समोर आलीय.
तर दुसरीकडे नक्की दुसरं पर्व येतय की हे एप्रिल फूल करण्यात आलय असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र सोनी मराठीच्या अधिकृत अकाउंटवरुन ही घोषणा करण्यात आली असल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सोनी मराठीने केलेला हा एप्रिल फूल मात्र गमतीशीर ठरलाय.