By  
on  

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर आले अभिनेते अशोक सराफ, जुन्या आठवणींना दिला उजाळा

'इंडियन आयडल मराठी' मंचावर सुरांची मैफिल तर अनुभवायला मिळतेच पण सोबतच विविध पाहुणे मंडळी या मंजावर हजेरी लावतात. सध्या महाराष्ट्राला  उत्तम ६ स्पर्धक मिळाले आहेत. यातच यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. हा खास भाग लवकरच प्रसारित होणार आहे.

मनोरंजन विश्वात अशोक मामा म्हणून ओळख असलेल्या अशोक सराफ यांनी यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी अशोक सराफ यांच्यावर चित्रीत झालेली काही खास गाणी स्पर्धक मंचावर सादर करताना दिसतील.

अशोक सराफ यांची खास गाणी या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत. यावेळी स्पर्धकांनी एकापेक्षाएक परफॉर्मन्स देऊन अशोक मामांचं मनं जिंकलं असेल यात शंकाच नाही. याशिवाय या गाण्यांसोबतच अशोक मामांनी काही खास आठवणींना उजाळा दिला असेल. गाणी आणि किस्स्यांनी रंगलेला हा भाग पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive