By  
on  

'स्वराज्य जननी'च्या रूपात दिसणार कोण?

वेगवेगळ्या विषयांवर मालिका सादर करणाऱ्या सोनी मराठीने रयतेच्या राजाला घडवणाऱ्या जिजाऊचं कर्तुत्व प्रेक्षकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्वराज्य जननी' असं या मालिकेचं नाव आहे. याचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवरायांवर बऱ्याच मालिका, सिनेमे, नाटकं आली. त्यात शिवबांच्या आईच्या रूपात आपण जिजाऊला पाहिलं आहे. मृणाल कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर या अभिनेत्रींनी या भूमिका अप्रतिमरित्या पार पाडल्या आहेत. मात्र नव्या दमाच्या अभिनेत्रींपैकी सोनी मराठीवर सादर होणाऱ्या स्वराज्य जननीसाठी कुणाची निवड झाली आहे, या स्वराज्य जननीच्या रूपातून नेमकं कोण आपल्या अभिनयाचा नवा पैलू प्रेक्षकांसमोर मांडणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive