By  
on  

पाहा Photos : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर गणरायाची मनोभावे पूजा

अनेक ठिकाणी आज गणरायाचं आगमन झालं आहेत. तर काही ठिकाणी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. टेलिव्हिजनवरील मालिका आणि कार्यक्रमांच्या सेटवरही बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेशोत्सव स्पेशल कार्यक्रमाचं जरी चित्रीकरण असलं तरी बाप्पाच्या उपस्थितीने आनंदाचं वातावरण पाहायला मिळतय.

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाच्या मंचावरही बाप्पा विराजमान झालेले पाहायला मिळालं.

या कार्यक्रमातील विनोदवीरांनी लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा केली. 

गणपती स्पेशल कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी या कार्यक्रमातील कलाकारांनी तयार होऊन स्पेशल कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं.

यावेळी डॉ.निलेश साबळे, भाऊ कदम,कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि इतर कलाकार टीम उपस्थित होती. 

 

यावेळी हे कलाकार पारंपारिक वेशभुषेत दिसले.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive