By  
on  

पाहा Video : अभिनेत्री माधवी निमकर सेटवर अशी घेतेय मास्टर क्लास

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आता हळुहळु वेगळं वळण घ्यायला लागली आहे. जयदीप आणि गौरी यांची प्रेमकहाणी सुरु होईल का याची प्रेक्षकांना उत्सुकता असतानाचा खलनायिका माधवी विविध कारस्तानं रचताना दिसते. मात्र हे सगळं ऑनस्क्रिन जरी असलं तरी ऑफस्क्रिन मात्र ही खलनायिका विविध गोष्टी करताना दिसते.

या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असलेली माधवी सेटवर काय काय करते हे पाहायचं असेल तर तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर डोकावल्यावर ते पाहायला मिळतं. कारण माधवी सोशल मिडीयावर सेटवरील ऑफस्क्रिन मस्ती पोस्ट करताना दिसते.

 

माधवीने नुकताच सेटवरील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सीनच्या ब्रेकदरम्यान कॅमेरामॅनकडून माधवी कशी कॅमेऱ्याच्या टेकनिक शिकतेय हे यात पाहायला मिळतय. याशिवाय सेटवरील अनेक ऑफस्क्रिन गोष्टी व्हिडीओच्या माध्यमातून माधवीने याआधीही शेयर केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive