By  
on  

“ओ भाऊ जरा चावडीवर या...” ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये विकएन्डला पाहायला मिळणार ‘चावडी’

बिग बॉस मराठीचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिझनची प्रेक्षकांनी बरीच वाट पाहिल्यानंतर या सिझनमध्ये बरेच सरप्राईज पाहायला मिळणार आहेत. शिवाय यंदाच्या सिझनमध्ये अनेक वेगळ्या गोष्टी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहेत. यापैकीच एक म्हणजे विकएन्डचा वार. प्रत्येक विकएन्डला या कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकर हे स्पर्धकांची शाळा भरवतात. मात्र तिसऱ्या सिझनमध्ये विकएन्डला असणारेय काही खास. ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये आता विकएन्डला प्रेक्षकांना चावडीचा आस्वाद घेता येणार आहे. कारण दर विकएन्डला असणारेय चावडी. 
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वातही मराठीपण आणि संस्कृतीची झलक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. यातच विकएन्डचा चावडी हा प्रकार पाहणं औत्सुक्याचं ठरेल. चावडी या शब्दातून मराठीपण समर्पक आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयीचा खुलासा करण्यात आलाय.

वायकॉम18 चे प्रमुख रवीश कुमार, कलर्स मराठी, (वायकॉम18) चे व्यवसाय प्रमुख अनिकेत जोशी, कलर्स मराठी (वायकॉम18) चे प्रोग्रामिंग हेड विराज राजे यांच्यासह महेश मांजरेकर यांनी चावडीचं स्वरुप थोडक्यात सांगितलं. 


प्रोग्रामिंग हेड विराज राजे म्हणतात की, “बिग बॉस मराठी सिझन३ आणि घराबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही “मराठीपण” आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. सेट डिझाईनपासून, टास्क, वेगवेगळया राऊंड मध्ये त्याची झलक दिसणार आहे. विकएन्डचा डाव याला आपण चावडीचं स्वरूप देणार आहोत. हे मराठीपण जपण्याच्या आमच्या हेतुमधलं सगळ्यात महत्वाचं पाऊल असणार आहे. अशाप्रकारे सिझन ३ मध्ये वेगळेपण साधण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे”

“ओ भाऊ जरा चावडीवर या...” असे या कार्यक्रमातील बोल असणार असल्याचं महेश मांजरेकर यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलय. या चावडीवर बऱ्याच गोष्टी होणार आहेत. ज्यात वाद मिटवले जाणार तर सल्लेही दिले जाणार. तेव्हा यंदाच्या पर्वातील या खास गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या 19 सप्टेंबर पासून ‘बिग बॉस मराठी 3’ हा कार्यक्रम कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.
 

 

Recommended

PeepingMoon Exclusive