बिग बॉस मराठी 3 : असा रंगला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड प्रिमियर सोहळा, स्पर्धकांच्या डान्सनी आणली रंगत

By  
on  

दोन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अखेर बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नुकताच बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड प्रिमियर मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि बिग बॉस मराठीचे सुपर होस्ट महेश मांजरेकर यांची ग्रँड एन्ट्री झाली. महेश मांजरेकर यांनी दरवर्षी प्रमाणे सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. पण यंदाच्या सिझनमध्ये अनेक सरप्राईज पाहायला मिळाले.

यंदा फक्त महेश मांजरेकरच नाही तर त्यांच्या सोबतीला आणखी एक खास चेहरा दिसला. अभिनेता सिद्धार्थ जाधव त्यांच्या सोबतीला कोहोस्ट म्हणून पाहायला मिळाला. दोघांची ही हटके जोडी यावेळी लक्षवेधी ठरली. शिवाय त्यात विनोदी तडका पाहायला मिळाला.

यावेळी 15 स्पर्धकांची धमाल परफॉर्मन्स सह ग्रँड एन्ट्री झाली. अभिनेत्री सोनाली पाटील, विशाल निकम, स्नेहा वाघ, उत्कर्ष शिंदे, मिरा जगन्नाथ,  तृप्ती देसाई, अविनाश दार्वेकर, सुरेखा कुडची, गायत्री दातार, विकास पाटील, शिवलीला पाटील, जय दुधाणे, मीनल शाह, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी या 15 स्पर्धकांची आता बिग बॉस मराठी 3 च्या घरात एन्ट्री दाखवण्यात आली. यावेळी स्पर्धकांना घरात जाण्याआधीच घरातील विविध जागांची मालकी देण्यात आली. यात सेवक आणि मालकीण असं विभाजन करण्यात आलय. विशेषकरुन लेडीज स्पेशल थिम असल्याने महिला या मालकीण आणि पुरुष हे सेवकांची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे खेळात आणखी रंगत येणार आहे. 

तर दुसरीकडे टेम्प्टेशन रुमची घोषणा महेश मांजरेकर यांनी केली. या खोलीत विविध सुखसुविधा पाहायला मिळाल्या ज्याचा आस्वाद स्पर्धकांना घेता येणार आहे. यंदा विकएन्डचा वार संकल्पना नसून बिग बॉस मराठीमध्ये चावडी पाहायला मिळणार आहे. आता ही चावडी कशी रंगेल यासाठी विकएन्डची वाट पाहावी लागणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरात वाद, भांडण, मैत्री, प्रेम या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. हे 15 स्पर्धक आता 100 दिवसांत बिग बॉस मराठीच्या घरात आता काय राडा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Recommended

Loading...
Share