बिग बॉस मराठी 3 Day 1 : पार पडली तिसर्‍या पर्वाची पहिली नॉमिनेशन प्रकिया, कोण असेल टाकाऊ आणि कोण ठरेल टिकाऊ?

By  
on  

विविध 15 स्पर्धकांची बिग बॉस मराठी 3 च्या घरात एन्ट्री झाली आहे. ग्रँड प्रिमियरसह बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली आणि याचसोबत सिध्दार्थ जाधवने महेश मांजरेकर यांना उत्तम साथ देत सगळ्यांची मनं जिंकली. तर स्पर्धकांनी घरात एन्ट्री करण्याआधी मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स सादर केले.

  

बिग बॉस मराठी 3 चा पहिला दिवस स्पर्धकांसाठी कसा असेल हे पाहण महत्त्वाचं ठरेल. एकीकडे पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये वादाची ठिणगी पेटली. तर दुसरीकडे नॉमिनेशन प्रक्रिया देखील पार पडली आहे. पहिल्याच दिवशी स्पर्धकांना एक टास्क देऊन ही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडलीय. 

'टाकाऊ की टिकाऊ' हा टास्क यावेळी स्पर्धकांना देण्यात आला. यावेळी स्विमिंग पुलच्या जागेवर हा टास्क देण्यात आला. या टास्कचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आलाय. 

 

पहिल्या नॉमिनेशन द्वारे लढाईचा प्रारंभ होणार आहे. सदस्यांचा हा पहिला दिवस कसा होता ? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीये मध्ये कोण कोण नॉमिनेट झाले ? हे पहिल्या भागात पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share