लग्नाबद्दलच्या खुलास्यावर काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारलं, तर दुसऱ्या पतिने मागितले छळ केल्याचे पुरावे

By  
on  

बिग बॉस मराठी 3 हे नुकतच सुरु झालय. नुकत्याच सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे फक्त दोन भाग झालेले असतानाच हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय. या कार्यक्रमाच्या ग्रँड प्रिमियरनंतरच काही स्पर्धक मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघ. स्नेहाचा पहिला पति अविष्कार दार्वेकरही या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून आहे. याची बरीच चर्चा झालीय. मात्र स्नेहाने बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याआधी काही तिच्या खासगी आयुष्यातील दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नांचा खुलासा केला होता. ज्यात तिने पहिल्या पतिकडून घरगुती हिंसाचार आणि दुसऱ्या पतिकडून छळ झाल्याचं म्हटलं होतं. स्नेहाची ही दोन्ही लग्नं टिकली नाहीत. स्नेहाच्या या विधानामुळे हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबीने स्नेहावर निशाणा साधला आहे. 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून काम्याने स्नेहाविरोधात विधान केलय. ज्यात तिने खेळासाठी अशा चूकीच्या कहाण्या बनवण्याचा आरोप तिच्यावर केलाय.

 

काम्या या ट्विटमध्ये लिहीते की, "तुला बिग बॉसच्या घरात यायचं होतं चांगली गोष्ट आहे. तू आलीस देखील. मात्र विक्टिम कार्ड कशाला खेळतेय ? तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल कल्पना नाही मात्र दुसऱ्या लग्नाबद्दल काहीही कहाण्या नको सांगूस. तेही या चार दिवसांच्या गेमसाठी. तुला चांगलं माहितेय मी सत्य बाहेर आणू शकते. असा वाईट खेळ खेळू नकोस” असं म्हणत काम्याने स्नेहाला फटकारलय. 

एवढच नाही तर काम्याने एका नेटकरीच्या कमेंटवर देखील रिप्लाय केलाय. ज्यात तिने स्नेहा वाघचा दुसरा पति तिच्या परिवारासारखा असल्याचं म्हटलय.

 

तर दुसरीकडे स्नेहा वाघचा दुसरा पति अनुराग सोलंकीने काम्याच्या या पोस्टवर त्याचिही धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "धन्यवाद काम्या. मला खूप धक्का बसला आहे की लोकं एका गेम शोसाठी या थराला जाऊ शकतात. मला काहीही म्हणण्याची इच्छा नाही पण स्नेहाला एक विनंती आहे. तू जेव्हा घराबाहेर येशील तेव्हा तू मला मी एकदातरी तुझा छळ केल्याचे पुरावे दे. मी तिचा दुसरा पति"

काम्या आणि स्नेहाचा दुसरा पति अनुरागच्या या ट्विटनंतर बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र स्नेहा बिग बॉस मराठीच्या घरात असल्यामुळे या कोणत्याच विधानावर व्यक्त होऊ शकत नाहीय. 

Recommended

Loading...
Share