बिग बॉस मराठी 3 Day 4 : स्पर्धकांना मिळालं मोठं सरप्राईज, दाखवली ही नवी खोली

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरी दररोज काहीना काही नवं घडत असतं. कधी नवा टास्क तर कधी नवा खेळ. असचं काहीसं नुकत्याच झालेल्या भागात पाहायला मिळालय. बिग बॉस मराठी 3 च्या स्पर्धकांना बिग बॉसने खास सरप्राईज दिलय. बिग बॉस मराठीच्या इतक्या मोठ्या घरात आणखी एक सरप्राईज खोली असल्याचं बिग बॉसने सांगितलय. हे ऐकताच स्पर्धकही चकीत झाले.

या नव्या खोलीचं नाव आहे Temptati on Room (टेम्प्टेशन रुम). या खोलीची पहिली झलक बिग बॉसने या वेळी स्पर्धकांना दाखवली. ज्यात स्पर्धकांसाठी बरेच सरप्राईज आहेत.

या रुममध्ये फोनबूथ आहे. ज्याचा उपयोग करुन सदस्य बाहेरील जगातील जवळच्या व्यक्तिंशी संपर्क साधू शकतील.

तर खाण्याचे विविध चविष्ट पदार्थही आहेत. जे बिग बॉसच्या घरात उपलब्ध नसतात. तर दुसरीकडे या खोलीत बायोस्कोप आहे ज्याचा वापर करून सदस्य घराच्या आत डोकावू शकतील. 

याशिवाय पावर कार्ड आणि बुक ऑफ टेम्प्टेशनची झलकही यावेळी दाखवली. मात्र त्याचं गुपित अद्याप गुलदस्त्यातच आहे. या खोलीत शिरल्यावरच या गोष्टींचा खुलासा होणार आहे. तेव्हा टेम्प्टेशन रुमचा आस्वाद कुणाला घेता येईल हे पुढील भागात समोर येईलच. 

 

Recommended

Loading...
Share