Bigg Boss Marathi 3 Day 4 : आविष्कार दार्वेकर आणि मीरा जगन्नाथचा घरच्या ड्युटीवरुन वाद, मीरा म्हणते "मी नडायला गेले तर वाट लावीन"

By  
on  

बिग बॉस मराठी 3 मध्ये यंदा पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांना विविध टास्क मिळाले आहेत. यात ग्रँड प्रिमियरपासूनच स्पर्धकांना घरच्या ड्युटी मिळाल्या आहेत. मात्र यंदा पुरुष स्पर्धक हे सेवक आणि महिला स्पर्धक या मालकीण असल्याने या खेळात आणखी रंगत आली आहे. मात्र त्यामुळे वादही होताना दिसतात. 

यात प्रत्येक महिला स्पर्धकांना त्यांचे सेवक देण्यात आले आहेत. मीरा जगन्नाथसोबत आविष्कार दार्वेकरला सेवक ठेवण्यात आलय. मात्र आता दोघांचे खटके उडू लागलेत. मीराच्या सततच्या काम देण्याच्या स्वभावाने आविष्याकरची चिडचिड होऊ लागलीय. म्हणूनच नुकताच दोघांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. 

इतर स्पर्धकांप्रमाणे मीरा तिचा बेडची आवराआवरा करत नसल्याचं आविष्कारने सांगताच मीराला राग आला. यावरुन मीरा बिग बॉसला आविष्कारविषयी तक्रार करणार असल्याचं सांगतेय. शिवाय घरातील इतर सदस्यांना आविष्कार हे जाणूनबुजून करत असल्याचं म्हणतेय. आविष्कार हा मुद्दाम नडत असल्याच सांगत ती पुढे म्हणते की, "मी नडायला गेले तर वाट लावीन"

आता मीरा आणि आविष्कारमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. मीराच्या या वागण्यामुळे आविष्कारचा संयम तुटेल का ? पुन्हा दोघांचा वाद होईल का हे पुढील भागांमधून समोर येईलच.

Recommended

Loading...
Share