By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 14 : जय - विरुची जोडी असलेले विशाल आणि विकास आपआपसातच भिडले

बिग बॉस मराठी 3 मध्ये स्पर्धकांना आता विविध उपकार्य दिले जात आहेत. यात घरातील विविध वस्तू आणि खोल्या पणाला लागल्यात. यात स्पर्धकांचे दोन गट नेमण्यात आलेत. ज्यात काहींचे घरात तयार झालेले ग्रुपही विभागले गेले आहेत. त्यामुळे टास्कदरम्यान मित्रांमध्येही राडा होताना दिसतोय. 

नुकताच एक टास्क या स्पर्धकांना देण्यात आला. यावेळी हातातील पाण्याने भरलेले बाऊल घेऊन एका वर्तुळात चालायचे होते. हा टास्क सुरु होताच हातापायी आणि वाद सुरु झाले. ज्यात विशाल आणि विकासचा वाद झाला. या टास्कमध्ये नेमकं काय झालं ते आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

मात्र पहिल्या दिवसापासून घट्ट मित्र असलेले विशाल निकम आणि विकास पाटील आता भांडताना दिसणार आहेत. दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला ? या वादानंतर दोघांमध्ये पुन्हा मैत्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive