बिग बॉसचं घर असं आहे जिथे मनातल्या गोष्टी कुणासोबत शेयर करायचा हा देखील मोठा प्रश्न असतो. मग या घरात ज्या व्यक्तिंसोबत चांगलं जमतं त्यांच्यासोबत मनातल्या गोष्टी शेयर केल्या जातात. सुरेखा कुडची यांनी अशीच एक मनातली खंत व्यक्त केली आहे. आजच्या भागात त्या जय दुधाणे आणि स्नेहा वाघसोबत बोलताना दिसतील.
त्यांच्या मनातील एक महत्वाची गोष्ट स्नेहा आणि जयला सांगताना त्या दिसणार आहेत.
सुरेखा ताई स्नेहा आणि जयला सांगत आहेत की, “जेवण बनवताना उत्कर्ष, गायत्री, मीरा होते त्यावेळेस मी तिला म्हंटल स्नेहा पण होती तुम्ही सगळ्यांनी ठरवून आम्हांला चौघांना बाजूला काढलं आहे नॉमिनेट केले आहे. आम्ही तुमच्या दृष्टीने वीक आहोत म्हणजे कोण दादुस, मी, तृप्ती आणि स्नेहा ही पण नको आहे त्यांना. म्हणून मला तो राग आला की, जेव्हा कॅप्टन बनवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही विचार करता काय तो त्या टास्कमध्ये मस्त केलं. आम्ही नाही करू शकत, काही टास्कमध्ये आम्ही नाहीच खेळू शकत. आपल्या इथे सांगतात युक्ति वापरा. आपल्याकडे अजिबात युक्ति वापरली नाही जात फक्त शक्तीचा वापर होतो जिथे आम्ही कमीच पडणार. आणि किचन एरिया जो आहे त्याला शून्य किंमत आहे. किती पण प्रेमाने करून घाला, जिवाचं रान करा त्याला किंमत नाहीये. त्याची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडू”
सुरेखा कुडची यांनी ही खंत यावेळी व्यक्त केली. मात्र सुरेख यांना नेमका कोणत्या गोष्टीचा राग आलाय ? या गोष्टी त्या स्नेहा आणि जयसोबत का शेयर करत आहेत हे आजच्या भागात समोर येईल.