बिग बॉस मराठी 3 : चावडीवर महेश मांजरेकरांनी घेतली जयची शाळा

By  
on  

बिग बॉस मराठी 3 च्या घरात या आठवड्यात विविध टास्क झाले, वाद-विवाद झाले या सगळ्यांचा निकाल आता विकएन्ड चावडीवर लागणार आहे. कारण या आवड्यात स्पर्धकांचे एकमत न झाल्याने या आठवड्यात कॅप्टन झालाच नाही. त्यामुळे महेश मांजरेकर आता स्पर्धकांची शाळा घेणार आहेत.

आजच्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकर जय दुधाणेची शाळा घेताना दिसतील. दादुस यांनी कॅप्टन्सीसाठी जयला मत न दिल्याने जयने रागात दादुस यांना ग्रुपमध्ये न घ्यायची चर्चा केली होती. शिवाय घरात जयच्या ग्रुपला सगळे घाबरतात असही म्हटलं होतं. यावरुन महेश मांजरेकर यांनी जयची शाळा घेतली आहे. 

यावर महेश मांजरेकरांनी जयच्या ओव्हर कॉन्फिडन्सविषयी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. तेव्हा जयसोबत चावडीवर कुणाची शाळा घेतली जाईल हे पाहणँ महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share