बिग बॉस मराठी 3 मध्ये यंदा एक वेगळं स्वरुप पाहायला मिळतय. टेम्प्टेशन रुम ही नवी खोली यंदाच्या सिझनमध्ये पाहायला मिळतेय. मात्र अद्याप या खोलीचा वापर स्पर्धकांनी केलेला नाही. मीरा जगन्नाथकडे या खोलीचा वापर करण्याची संधी होती. मात्र तिने त्याचा वापर केला नव्हता. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच एन्ट्री केलेला वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिश वैद्यला ही संधी मिळणार आहे.
टेम्प्टेशन रुममधील पॉवर कार्डचा वापर करून आदिशला एक मोठा अधिकार मिळणार आहे. ज्याचा वापर करून आदिशला घरातील कोणत्याही तीन सदस्यांना रात्रभर बिग बॉसच्या घरात पहारे द्यावे लागणार आहेत. तेव्हा आदिश कोणत्या तीन सदस्यांची निवड करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मात्र आदिशला हा अधिकार मिळताच इतर स्पर्धकांचे चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसत आहेत. या नव्या एन्ट्रीने इतर स्पर्धकांना धक्का बसला असणार यात शंका नाही.
आदिशला आणि कोणते अधिकार मिळतात आणि त्याचा तो कसा वापर करतो हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल.
आदिशच्या एन्ट्रीने इतर स्पर्धकांची काय प्रतिक्रिया असेल हे आजच्या भागात पाहायला मिळेल.