By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 16 : वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिशला स्नेहा म्हणते, "आल्या आल्या त्रास दिला"

बिग बॉस मराठी 3 मध्ये आता एक वेगळं वळण पाहायला मिळणार आहे. कारण नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. अभिनेता आदिश वैद्या या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री करतोय. मात्र बिग बॉसने घरात जाण्याआधी आदिशला एक महत्त्वाचं कार्य दिलं. ज्यात आदिशला टेम्प्टेशन रुममध्ये सोडण्यात आलं जिथे त्याने पॉवर कार्डचा वापर केलाय. ज्यामुळे घरातील कोणत्याही तीन स्पर्धकांना रात्री जागून घरात पहारे देण्याचं कार्य होतं. आता तो कोणत्या तीन स्पर्धकांची निवड करतो हे आजच्या भागात पाहायला मिळेल. 

मात्र आदिशला मिळालेल्या अधिकाराचा वापर केल्यानंतर इतर स्पर्धक प्रतिक्रिया देऊ लागलेत. यात स्नेहा वाघने आदिशला त्याच्या या वागण्याचा इतरांना त्रास झाल्याचं निदर्शनास आणलं. किचनमधील टेबलावर बसून स्नेहा आदिशला म्हणते की, "आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमची तीन लोकं जखमी केली"

यावर आदिश म्हणतो की, "कुठलेतरी तीन होणारच होते. समजा तू असतीस तर मला जे विचारलं गेलं ते तुला विचारलं गेलं असतं तर"

या प्रश्नावर स्नेहा उत्तर देते की, "कदाचीत माझी पद्धत वेगळी असती. सगळ्या गोष्टीची डील करण्याची पद्धत वेगळी असती. मी पण घेतली असती कॅप्टन्सी पण नंतरच्या गोष्टी वेगळ्या पद्धतिने डील केल्या असत्या. पण हे गरजेचं नाही की आपल्या एखाद्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे. तो त्रास कमी करूनही गोष्टी केल्या असत्या."

आता आदिशच्या निर्णयानंतर इतर स्पर्धक त्याच्याशी कसे वागतील हे पाहणं महत्त्वाचं असेल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive