बिग बॉस मराठी 3 : जय आणि स्नेहासोबत सुरेखा यांची चर्चा, म्हटल्या "त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरं"

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतच नॉमिनेशन कार्य पार पडलय. ज्यामध्ये घरातील पाच सदस्य सुरक्षित झाले तर बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. या टास्कदरम्यान सुरेखा कुडची सदस्यांवर नाराज असल्याचं दिसून आलं. जीपमध्ये बसण्याची संधी कोणत्या सदस्याला मिळेल यावरून टीम घेत असलेल्या निर्णयावर सुरेखा ताईंनी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाल्या की "तुम्ही जे ठरवाल त्याला मी मत देईन." आजच्या भागातही जय त्याविषयी सुरेखाताईंशी बोलताना दिसणार आहे. 
 

जयने विचारले की, “सुरेखाताई तुम्ही का नाही आलात ? तुम्ही येऊन जरी गेला असता तरी चाललं असतं." यावर सुरेखा म्हटल्या की, “मी तिथे यायचं, तुम्ही मला उतरवणार. त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरं ना."

यावर जय आणि स्नेहा मिळून सुरेखा यांना त्यांच्या मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करणार आहे जय म्हणतो की, “तुम्ही चुकीचचं बोलत आहात. सुरूवातीला येणं तुमचा भागच नव्हता. तुम्ही विकासला पण विचारा तो जेव्हा आत आला तेव्हा आम्ही डील केलं होतं. याच्यानंतर दादुस येणार आणि नंतर तुम्ही येणार आणि हे डील झालं होतं. हवं तर त्याला विचारा”.


 
तेव्हा या टास्कनंतर बिग बॉस मराठीच्या घरात काय वातावरण असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share