या अभिनेत्रीला दोन वर्षांपूर्वी झाली होती गुडघ्याला दुखापत, आता फिटनेसकडे देतेय लक्ष

By  
on  

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून अभिनेत्री वैदेही परशुरामीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्यानंतर वैदेही बॉलिवुडमध्येही दिसली. रणवीर सिंहच्या सिम्बा चित्रपटात तिने एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र नवीन वर्षात आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष देण्याचं निर्णय आता वैदेहीने घेतला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Two years ago I faced a minor knee injury...had to stop exercising! I thought I’ll be able to manage with eating right, basic walking, a bit of dancing, but little did I know that this was gonna throw me out of shape, mentally and physically both. I kept fretting over what I should do to get back in shape/lose weight...kept whining about how I didn’t match certain standards...a lot of people kept asking me - “Oh, have you gained weight?” and it kept killing me inside... In this process I forgot the most important thing - fitness & health! This new year I’ve decided to focus on my inner and outer strength, health and fitness rather than trying to fit into certain stereotypes! It’s been a few months that I’ve been working on myself with the help of my fitness trainer @sandeep_mohite77 This year the goal is a better and fitter me rather than a thinner me!

A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi) on

नुकताच सोशल मिडीयावर वैदेहीने एक व्हिडीओ शेयर केला आहे. यात वैदेही वर्कआउट करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वैदेही म्हणते की, “दोन वर्षांपूर्वी गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली होती.. मग मी व्यायाम थांबवला! मला वाटले की माझ्या शरीराचा आकार बदलेल, मानसीक आणि शारिरीक परिणाम होईल. माझं हेच रडगाणं सुरु होतं की मी पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी काय करु ?  बरीच लोकं मला विचारायची की, “तुझं वजन वाढलं का?”  या सगळ्यात मी महत्त्वाची गोष्ट विसरली होती ती म्हणजे फिटनेस आणि आरोग्य. या नवीन वर्षात मी ठरवलयं की मी माझ्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे लक्ष देणार आहे. काही महिन्यांपासून मी माझ्या फिटनेसवर काम करतेय यात मला माझा फिटनेस ट्रेनर संदिप मोहितेची मदत होते आहे. यावर्षी बारीक होण्याऐवजी फिट होण्याचं माझं लक्ष आहे.    ”

वैदेही अशाप्रकारे आता तिच्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. त्यामुळे लवकरच वैदेहीचा फिट लुक पाहायला मिळेल.
 
 

Recommended

Loading...
Share