साडेपाच तासांच्या चौकशीनंतर एनसीबी कार्यालयातून निघाली दीपिका पादुकोण आणि करिश्मा प्रकाश

By  
on  

साडेपाच तासांपेक्षाही जास्त वेळ प्रश्नोत्तरे झाल्यानंतर दीपिका पादुकोणसोबत एनसीबीची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर दीपिका एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. यावेळी तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशही एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. 

 दीपिका सकाळी 9वाजून 45 मिनिटांनी एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली होती. त्यावेळी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशही तिथे उपस्थित राहिली. 

दीपिका ही साउथ मुंबईच्या 7 स्टार हॉटेलात राहत होती. पति रणवीर सिंह तिच्यासोबत एनसीबी गेस्ट हाउसपर्यंत आला आणि तिला तिथे सोडल्यानंतर पुन्हा हॉटेलात निघून गेला. 
 

तर दुसरीकडे श्रद्धा कपूर आणि सारा अली खान देखील अजून एनसीबीच्या प्रश्नांना सामोरे जात आहेत.

Recommended

Loading...
Share