नीतू कपूर यांनी शेयर केला रणबीर कपूर आणि रणवीर सिंहचा एकत्र फोटो, एकत्र करत आहेत सेलिब्रेशन

By  
on  

8 डिसेंबरपासून बॉलिवुड सेलिब्रिटीज हे त्यांचे परिवार आणि मित्रमंडळींसोबत नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईहून रवाना झाले आहेत. बरेच सेलिब्रिटीज नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भारतातील विविध राज्यात फिरणं पसंत करत आहेत.  

नुकतच रणबीर कपूर हा त्याच्या परिवारासोबत जयपुरला रवाना झाला होता. यावेळी रणबीरची आई नीतू कपूर, बहिण रिद्धिमा कपूर साहनी, भरत साहनी, समायरा साहनी आणि रणबीरची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट एकत्र जयपुरला रवाना झाले. याशिवाय रणवीर सिंह आणि दीपिका पदूकोणही जयपूरला गेले. मात्र नीतू कपूर यांच्या सोशल मिडीया पोस्टवरून रणवीर आणि रणबीर हे न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये एकत्र सहभागी असल्याचं पाहायला मिळालं. नीतू कपूर यांनी शेयर केलेल्या फोटोंमध्ये रणबीर आणि रणवीर एकत्र दिसले आहेत. मात्र या फोटोंमध्ये आलिया आणि दीपिका दिसल्या नाहीत. 

आलियाची आई सोनी राजदान आणि बहिण शाहीन भट्ट देखील या ट्रीपचा भाग बनली आहेत. मंगळवारी दुपारी ही सगळी परिवार मंडळी जयपुरला पोहोचली.  रणबीर आणि आलिया हे जयपुरमध्ये परिवारासोबत एकत्र असल्यामुळे दोघं डेस्टिनेशन वेडिंग किंवा साखरपुडा करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत रणबीरने आलियासोबत लग्न करण्याविषयी सांगितलं होतं. जर कोरोनाचं संकट नसतं आलं तर कधीच दोघांचं लग्न झालं असतं असं रणबीर बोलला होता. 

Recommended

Loading...
Share