By  
on  

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची घोषणा, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान फार महत्त्वाचे आहे. थोर विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार, कवी आणि स्वातंत्र्यसेनाने असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. याच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्यावर आधारित बायोपीकची घोषणा नुकतीच करण्यात आली. फिल्ममेकर आणि निर्माता संदीप सिंह या चित्रपटाची निर्मिती करत असून प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
या बायोपीकचे दिग्दर्शक करण्याविषयी महेश मांजरेकर सांगतात की, “मी कायम स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन आणि त्या काळाविषयी आकर्षित झालोय. ते असे व्यक्ति आहेत ज्यांना इतिहासाय योग्य स्थान मिळालेलं नाही. त्यांना त्यांचा हक्क नाही मिळाला. त्यांच्या जीवनाने खूप लोकांना प्रभावित केलं आहे. मला माहिती आहे की एक दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. पण मला हे आव्हान स्विकारायचं आहे. ”

 सावरकर यांच्या कथेचे हक्क मिळवून घेणारे संदीप सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 138 व्या जयंती निमित्ताने या चित्रपटाची घोषणा केली आहे. ते सांगतात की, “वीर सावरकर यांच्याविषयी कौतुक केलं जात पण टीकाही होत असते. मला असं वाटतं की बऱ्याच जणांना स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याविषय़ी जास्त माहिती नाही. कुणीही या गोष्टीला नकार देऊ शकत नाही की ते आपल्या स्वतंत्रता संग्रामचे महत्त्वाचा भाग होते आणि त्यांच्या जीवनातील प्रवास लोकांपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या बायोपीक चित्रपटाचं चित्रीकरण लंडन, अंदमान आणि महाराष्ट्र या ठिकाणी करण्यात येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive