By  
on  

दीपिका पादुकोण बनली निर्माती; अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अगरवालची साकारणार भूमिका

पदमावत सिनेमाच्या तुफान यशानंतर बरेच महिने दीपिका पादुकोणचा कुठलाच सिनेमा प्रदर्शित झाला नाही किंवा तिने कुठला सिनेमा साईन केल्याचे ऐकीवात नाही. पण आता नुकतंच एक बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे, ते म्हणजे मेघना गुलजारच्या आगामी सिनेमाची दीपिका नायिका असणार. महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा अ‍ॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर हा सिनेमा आधारित असणार आहे.

मुंबई मिरर या वृत्तपत्रासोबत बोलताना दीपिका म्हणाली, ही कथा जेव्हा मी ऐकली तेव्हा मी खुप अचंबित झाले. ही कथा फक्त हिंसाच नाही तर धाडस आणि साहसाचीसुध्दा आहे, म्हणूनच या कथेने माझ्यावर इतका प्रभाव टाकला की या सिनेमाची निर्मिती करण्याचा मी निश्चयच केला.

लक्ष्मी अगरवाल या दिल्लीस्थित मुलीवर एकतर्फी प्रेम करणा-या तिच्याच मैत्रिणीच्या भावाने लग्नाला नकार दिला म्हणून अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला होता. ही घटना २००५ सालची. तेव्हापासून तिने फक्त अ‍ॅसिडहल्ल्याशी झुंज दिली. स्वत:चा चेहरा कसा जळत होता आणि त्यावर किती शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, याच्या कटू आठवणी लक्ष्मीकडे आहेत; पण त्याहीपेक्षा हे घडवणाऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठी तिने केलेला लढा आता सिनेमारुपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तिने जनहित याचिकेतर्फे अ‍ॅसिड हल्ला पिडीतांच्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणीसुध्दा केलीय.

2014 साली लक्ष्मीला ‘इंटरनॅशल विमेन ऑफ करेज अवॉर्ड’नं गौरविण्यात आलं. आता लक्ष्मी अॅसिड हल्ल्यातील पिडीतांसाठी काम करते. तिचा आदर्श प्रत्येकाने ठेवावा असाच आहे.

दीपिका पादुकोण लवकरच या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळतेय.

Recommended

PeepingMoon Exclusive