By  
on  

कॅन्सरशी झुंज देणा-या सोनाली बेंद्रेची प्रियंका चोप्राने घेतली भेट, पोस्ट केला हा खास फोटो

अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत असलेली बॉलिवूडची गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रेची प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली आणि तिच्यासोबत काही खास क्षण एन्जॉय केले. देसी गर्ल कधीही न्यूयॉर्कमध्ये असली की आवर्जून सोनालीची भेट घेते.

प्रियंकानेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सोनालीसोबतचा हा छान फोटो शेअर केला आहे. या दोघींसोबतच त्यांच्या इतर मैत्रिणीसुध्दा पाहायला मिळतायत.सध्या उपचार घेऊन कंटाळलेल्या सोनालीलासुध्दा प्रियंकाची ही सरप्राईज विजीट नक्कीच आवडली असणार यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/BoytMOdgC2_/?taken-by=priyankachopra

आपल्या उपचाराविषयी,तिच्या आजारपणातील दिनक्रमाविषयी सोनाली बेंद्रे नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही ना काही अपडेट्स सतत देताना पाहायला मिळते. सोनालीने आपल्या केसविरहित नवीन लुक्सचे फोटो आणि कोलाजचा एक व्हिडीओ शेअर करत एक हद्यस्पर्शी पोस्ट केली होती. महत्त्वाचं म्हणजे विगसाठी हेअरस्टाईलिस्ट सुचविल्याबद्दल सोनालीने या पोस्टमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राचे आवर्जून आभार मानले आहेत. यावरुनच प्रियंका चोप्रा आणि सोनाली बेंद्रे यांच्या मैत्रीची कल्पना येते.

मागील काही महिन्यांपासून सोनाली न्यूयॉर्क येथे उपचार घेत आहे. तिचे पती गोल्डी बहलसुध्दा तिच्यासोबत असून ते तिची भरपूर काळजी घेत आहेत. सोनालीच्या या धैर्याला बॉलिवूडसोबतच तमाम चाहत्यांचा त्रिवार सलाम. ती लवकरच या कठीण प्रसंगून बाहेर पडेल ही सदिच्छा.

Recommended

PeepingMoon Exclusive