By  
on  

आता गुगल मॅपवर मि. परफेक्शनिस्ट आमिर खान बनणार वाटाड्या

आजकाल सिनेमाच्या प्रोमोशनसाठी नानाविविध फंडे वापरले जातात. सिनेमा लोकांपर्यंत पोहचता यावा यासाठी हे मार्केटिंगचे हटके फंडे असताता.पण यात कोण कधी काय करेल याचा तर नेमच नसतो. असाच एक आगळा-वेगळा प्रोमोशनल फंडा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमासाठी वापरण्यात आला आहे.

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान लवकरच गुगल मॅपवर वाटाड्या म्हणून अवतरणार आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमात आमिर ‘फिरंगी भल्ला’ ही भूमिका साकारत आहे. हेच पात्र आता गुगल मॅपवर रस्ते दाखविण्यात मदत करणार आहे. गुगल मॅप वापरताना आपल्याला अॅन्ड्राईड किंवा आयओएस स्मार्टफोनवर या फिरंगीसोबत प्रवास करण्याचा पर्याय निवडता येईल. त्यानंतर ‘फिरंगी भल्ला’ हा गाढवावार बसून प्रवास करताना दिसणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला आपल्या इच्छित स्थळापर्यंत वाट दाखवणार आहे.

गुगल मॅप्सच्या प्रोडक्ट मॅनेजर नेहा वायकर या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'सोबतच्या सहयोगाबद्दल म्हणाल्या, भारतात आम्ही प्रथमच अशाप्रकारचा प्रयोग करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहोत.ठग्स ऑफ हिंदोस्थान हा बहुचर्चित सिनेमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत, पण अशातच सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी आपला प्रवास सुखकर करण्यासाठी हा फिरंगी येतोय.

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या सिनेमात आमिरसोबतच अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यंदा दिवाळीत हा सिनेमा कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत पाहणं एक पर्वणीच ठरणार आहे, यात शंका नाही. येत्या 8 नोव्हेंबरला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive