By  
on  

पाहा दीप-वीरच्या इटलीतील लग्नसोहळ्यातला हा पहिला फोटो

दीपिका आणि रणवीर या बॉलिवूड लव्हबर्डसच्या लग्नातील एक झलक पाहण्यासाठी चाहते उतावीळ झाले होते. अनेक सुरक्षेच्या अटी ठेवत दीप-वीरने पाहुण्यांच्या मोबाईल फोन आणि कॅमे-यावर बंदी घातली होती. आता दीर्घ प्रतिक्षेनंतर लग्नातला हा खास फोटो तमाम चाहत्यांना पाहायला मिळतोय. पती-पत्नी झाल्यानंतरचा हा त्यांचा फोटो पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता होती.

लेक कोमो येथील नयनरम्य अशा व्हिलामध्ये कोंकणी पध्दतीने विवाहबध्द झाले. दीपिका कोंकणी असल्याने आज 14 नोव्हेंबरला कोंकणी पध्दतीने विवाहसोहळा संपन्न झाला तर उद्या 15 नोव्हेंबर रोजी रणवीरच्या कुटुंबियांसाठी सिंधी पध्दतीने विवाह पार पडला.

 

पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 14 आणि 15 नोव्हेंबर हे दीप-वीरच्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवस ठरणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive