By  
on  

‘अमूल’कडून दीप-वीरला Delicious शुभेच्छा!

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह या बॉलिवूडच्या सुपरहिट कपलसाठी 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर हे दोन दिवस आयुष्यातील सर्वात सोनेरी दिवस आहेत. दीप-वीर 14 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी कोंकणी रितीरिवाजानुसार विवाहबध्द झाले. तर आज 15 नोव्हेंबर रोजी रणवीरच्या कुटुंबियांसाठी हे बॉलिवूड कपल सिंधी पध्दतीने विवाह करतील.

आपल्या सर्वांच्या लाडक्या दीप-वीर जोडीवर चोहोबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमूल या देशातील 1 क्रमांकाच्या डेअरी कंपनीकडून एक खास कार्टून रेखाटत Utterly buttterly delicious शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

'अमूल'च्या या कार्टून चित्रात रणवीर आणि दीपिकाच्या व्यक्तिरेखा वधू-वराच्या वेशात दिसत आहेत. त्याशिवाय Ranveer not single anymore! आणि The Deepik-tion of taste! असंही यावर लिहिण्यात आलं आहे.

https://twitter.com/Amul_Coop/status/1062675417864249344

दीपिका-रणवीर या नुकत्याच लग्नबंधनात डकलेल्या जोडीला यापेक्षा आकर्षक आणि कलात्मक शुभेच्छा कोणीच दिल्या नसतील, असो नांदा सौख्य भरे!

Recommended

PeepingMoon Exclusive