By  
on  

दीप-वीरचा सिंधी रितीरिवाजानुसार विवाह संपन्न; आयुष्यभर देणार एकमेकांना साथ

 दीपिका-रणवीर ही बॉलिवूडची सुपरहिट जोडी साता समुद्रापार इटली येथील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी असलेल्या व्हिला येथे विवाहबध्द होत आहेत.

दीप-वीर 14 नोव्हेंबरला कोंकणी रितीरिवाजानुसार विवाहबध्द झाले तर आज 15 नोव्हेंबर रोजी रणवीरच्या कुटुंबियांसाठी या बॉलिवूड कपलने सिंधी पध्दतीने विवाह केला आहे. कोंकणी लग्नाची व्हाईट ही थीम वर-वधू आणि इतर व-हाडी मंडळींसाठी ठेवण्यात आली होती. तर आज 15 नोव्हेंबरला होणा-या विवाह सोहळ्यासाठी लाल ही थीम ठेवण्यात आली आहे. या बॅण्ड बाजा बारातसाठी दीप-वीरने खुप खास व्यवस्था केली आहे.

फक्त 30 ते 35 पाहुण्यांसाठी असलेल्या या दीप-वीरच्या शाही विवाहसोहळ्यात विशेष पदार्थांची रेलचेल होती आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी त्यांनी शेफसोबत खास करार केल्याचंसुध्दा बोललं जात आहे. या लग्नात त्यांनी तयार केलेले पदार्थ ते इतर कुठेच ते तयार करणार नाहीत असा हा करार होता.

लग्नातील खास फोटोसुध्दा बाहेर व्हायरल होऊ नयेत म्हणून कडेकोट व्यवस्था करण्यात आली.  लग्नस्थळी जागोजागी जॅमर्स व ड्रोनवर बंदी घातल्यानंतर त्यांनी पाहुण्यांच्या मोबाईल फोनवरसुध्दा स्टिकर्स लावले. पण अजूनही त्यांचा लग्नातील एकही फोटो बाहेर प्रसिध्द झालेला नाही.

बॉलिवूडसह अवघं जग त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या फोटोची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या लग्नातील फोटो पाहायला मिळतील असे बोलले जात आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive