By  
on  

सूनबाई दीपिकाच्या स्वागतासाठी सजलं रणवीर सिंहचं घर

बॉलिवूडचं सुपरहिट कपल म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह या जोडीने सातासमुद्रापार इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी लग्नगाठ बांधली. त्यांचं लग्न दोन प्रकारच्या रितीरिवाजानुसार पार पडलं. एक म्हणजे दीपिकाच्या कुटुंबियांसाठी कोंकणी पध्दतीने तर रणवीरच्या कुटुंबियांसाठी सिंधी पध्दतीने हा लग्नसोहळा दोन दिवासांत थाटा-माटात पार पडला.

आता इटलीहून हे नवविवाहित दाम्पत्य भारतात परतणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी रणवीर सिंहचं मुंबईतील घर सजविण्यात आलं आहे. सूनबाई दीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरच्या घरच्यांनी जय्यत तयारी केल्याचं ही सजावट पाहून दिसून येतंय. फुलंाची सजावट आणि विविध विजेच्या तोरणांची अप्रतिम अशी रोषणाई रणवीरच्या घरावर पाहू डोळे अक्षरश: दिपून जातायत.

https://twitter.com/ani_digital/status/1063242497441304576

दीप-वीरचे फोटो लग्नातील फोटो पाहण्यासाठी चाहते प्रचंड उतावीळ झाले होते. तर आपल्या लग्नातले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होऊ नये, यासाठी खुप खबरदारी घेतली होती. अवघ्या देशाचं लक्ष यांच्या पहिल्या फोटोकडे लागलं होतं. पण अखेर बॉलिवूडकर आणि चाहत्यांची उत्सुकता शमवत दीप-वीरने चाहत्यांसमोर आपल्या लग्नातील ते अविस्मरणीय क्षण शेअर केले.

Recommended

PeepingMoon Exclusive