By  
on  

दीप-वीरच्या लग्नातला हा फॅमिली फोटो तुम्ही पाहिलात का?

दीपिका-रणवीर ही बॉलिवूडची सुपरहिट जोडी साता समुद्रापार इटली येथील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी असलेल्या व्हिला येथे विवाहबध्द झाले. थाटामाटात दोन दिवस पार पडलेल्या या लग्नासाठी चाहते आतुरलेले होते, अखेर त्यांनी लग्नाचे फोटो शेअर केले. या स्वप्नवत लग्नसोहळ्यातला एक फॅमिली फोटो नुकताच सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा फोटो रणववीरची स्टायलिस्ट निताशा गौरवने शेअर केलाय. सर्व पाहुण्यांनी व्हाईट आणि गोल्ड अशी थीम असलेले कपडे परिधान केले होते.

https://www.instagram.com/p/BqNF8jIgMhz/

दीप-वीर 14 नोव्हेंबरला कोंकणी रितीरिवाजानुसार विवाहबध्द झाले तर आज 15 नोव्हेंबर रोजी रणवीरच्या कुटुंबियांसाठी या बॉलिवूड कपलने सिंधी पध्दतीने विवाह केला. या बॅण्ड बाजा बारातसाठी दीप-वीरने खुप खास व्यवस्था केली आहे.

https://www.instagram.com/p/BqNF8gGh-os/

लग्नातील खास फोटोसुध्दा बाहेर व्हायरल होऊ नयेत म्हणून कडेकोट व्यवस्था करण्यात आली. लग्नस्थळी जागोजागी जॅमर्स व ड्रोनवर बंदी घातल्यानंतर त्यांनी पाहुण्यांच्या मोबाईल फोनवरसुध्दा स्टिकर्स लावले. यामुळेच त्यांचा लग्नातील एकही फोटो बाहेर प्रसिध्द झाला नाही.

बॉलिवूडसह अवघं जग त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या फोटोची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेर दोन्ही लग्न आटोपल्यावर 15 नोव्हेंबरला रात्री दीप-वीरने स्वत:च लग्नाचे फोटो शेअर केले होते.

Recommended

PeepingMoon Exclusive