By  
on  

नवविवाहित दाम्पत्य रणवीर-दीपिका बंगळूर रिसेप्शनसाठी रवाना

इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी स्वप्नवत विवाहसोहळा पार पडल्यानंतर बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी दोन दिवसांपूर्वीच मायदेशी परतले. हे नवविवाहित दाम्पत्य नुकतंच बंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या रिसेप्शनसाठी रवाना झाले आहेत. मुंबई एअरपोर्टवर दीप-वीरला स्पॉट करण्यात आलं आहे.

रणवीर सिंह शुभ्र पांढ-या रंगाच्या कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट अशा रूबाबदार वेषात दिसला.

तर दीपिका पादुकोण खुपच गोड अशा मोती रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये भागांत सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र व हातभर लालभडक चुडा अशा नव्या नवरीच्या  अंदाजात दिसली.

अवघ्या देशाचं लक्ष दीप-वीरच्या लग्नानंतरच्या पहिल्या फोटोकडे लागलं होतं. पण अखेर बॉलिवूडकर आणि चाहत्यांची उत्सुकता शमवत दीप-वीरने चाहत्यांसमोर आपल्या लग्नातील ते अविस्मरणीय क्षण शेअर केले.

Recommended

PeepingMoon Exclusive