म्हणूनच 30 नोव्हेंबर आहे देसी गर्ल प्रियंका चोप्रासाठी खास

By  
on  

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आत्ता काही तासांतच आपला विदेशी प्रियकर आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. जोधपूर येथील आलिशान अशा उमेद भवन येथे हा विवाहसोहळा शाही पध्दतीने पार पडेल.

पण तुम्हाला महितीय प्रियंकाच्या लग्नाचे अनेक विधी 30 नोव्हेंबरला पार पडतायत. कारण हा दिवस प्रियंकाच्या आयुष्यातील खुपच खास दिवस आहे. अहो, लग्नासाठी म्हणून नव्हे तर याच दिवशी तिने 2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे हा दिवस तिच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस आहे. म्हणूनच तिने आपल्या विवाहसोहळ्याचे कार्यक्रम या दिवसादरम्यान येतील अशीच तारीख लग्नासाठी निवडली. या दिवशी प्रियंकाचा संगीत सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर प्रियांकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मिस वर्ल्ड ते जगातील आघाडीची अभिनेत्री तिचा प्रवास आहे. हा यशस्वी टप्पा तिनं कठोर मेहनतीच्या जोरावर १८ वर्षांत पार केला. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते.

Tags

Recommended

Loading...
Share