मुलाकडचे विरुध्द मुलीकडचे अशी रंगणार प्रियंका-निकच्या टीमची क्रिकेट मॅच

By  
on  

ग्लोबल कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास आत्ता लवकरच विवाहबंधनात अडकतील. 2 डिसेंबर रोजी हे लव्हबर्डस् जोधपूर येथील भव्य आणि अलिशान अशा उमेद भवनात शाही पध्दतीने लग्नगाठ बांधतील. या खास लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातून दोघांचेही पाहुणे आले आहेत. म्हणूनच संगीत-मेहंदी या पारंपारिक विधींसोबतच निकयांकाच्या लग्नात एक खास धमाकेदार इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.

डीएनए वृत्तपत्राच्या वृत्तानुसार,शनिवारी म्हणजेच 1 डिसेंबर रोजी मुलाकडचे विरूध्द मुलीकडचे अशा दोन टीम्समध्ये चक्क क्रिककेटचा सामना रंगणार असून निक आणि प्रियंकासुद्धा या खेळात आपली एक खास खेळी खेळून जाणार आहेत. प्रियंकाच्या टीमचं नाव ‘पी’ ठेवण्यात आलं आहे तर निकच्या टीमचं नाव ‘टी’ आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका-निकच्या संगीत सोहळ्यातलं खास आकर्षण होतं, ते म्हणजे प्रियंका-निकच्या मित्र-मैत्रिणींचा खास अंदाजातला परफॉर्मन्स. त्यानंतर प्रियंकाच्या गर्ल गॅंगने देसीगर्लची लव्हस्टोरी गाण्यातून उलगडली. या परफॉर्मन्समध्ये अभिनेत्री आणि प्रियंकाची चुलत बहिण परिणीती चोप्राचासुद्धा समावेश होता.निकला हा परफॉर्मन्स खुपच आवडला.

दरम्यान, प्रियंका-निकच्या या लग्नसोहळ्यासाठी नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार असा जवळपास 200 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु दीप-वीरच्या पावलावर पाऊल ठेवत यांनीसुध्दा पाहुण्यांवर काही निर्बंध लादले आहेत. सर्व पाहुण्यांना आपला फोन लग्नाचे सर्व विधी संपेपर्यंत जमा करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना एक विशिष्ट टोकन देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना त्यांचा फोन परत मिळेल.

https://www.instagram.com/p/Bq0Xz_mFfmc/

Tags

Recommended

Loading...
Share