By  
on  

न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेणारी सोनाली बेंद्रे भारतात परतली

गेल्या अनेक महिन्यांपासून न्यूयॉर्क येथे कॅन्सरवर उपचार घेणारी बॉलिवूडची गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही नुकतीच भारतात परतली आहे. रविवारी मध्यरात्री ती पती गोल्डी बहल यांच्यासह मुंबई विमानतळावर आली.

सोनालीचे संपूर्ण कुटुंबिय मोठ्या उत्साहात तिचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर जमले होते. यावेळी सोनालीने आपल्या कुटुंबियांसह जमलेल्या चाहत्यांचे हात जोडून मनापासून आभार मानले. यावेळेस एनआयला दिलेल्या मुलाखतीत सोनालीचे पती गोल्डी म्हणाले, “सोनालीच्या तब्येतीत सुधारणा आहे. ती उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देतेय. सध्या उपचार संपले असले तरी नियमित चेकअपसाठी सोनाली विश्रांती घेऊन पुन्हा न्यूयॉर्कला जाणार आहे.”

https://twitter.com/ANI/status/1069361835319668743

 

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेद्रेंने आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची बातमी 4 जुलै, 2018 रोजी दिली होती. सोनाली सध्या मोठ्य धैर्याने कॅन्सरशी झुंज देत असून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होती.

 

सोनालीचे पती गोल्डी बहलसुध्दा तिच्यासोबत तिची काळजी घेण्यासाठी या तिच्या कठीण प्रवासात तिच्यासोबत खंबीरपणे  उभे आहेत

https://www.instagram.com/p/Bq4BuMeB82p/

दरम्यान, भारतात पोहोचल्यानंतर सोनालीने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळालं. एकमेकांपासून दूर गेल्यानंतर मनाने आपण अधिक जवळ येतो. मी भारतापासून दूर न्यूयॉर्कला गेल्यानंतर मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आता मी भारतात, माझ्या मायदेशी आले आहे. त्यामुळे आता मी माझ्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला भेटेन याचा मला खुप आनंद होतोय, असं सोनालीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive