By  
on  

दीपिका म्हणाली,‘भाभी मत कहो’; तेव्हा मराठी फोटोग्राफर्सने मारली अशी हाक

दीप-वीर ही बॉलिवूडची लाडकी जोडी इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी विवाहबंधनात अडकली आणि त्यानंतर त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन्स मुंबई आणि बंगळूर येथे पार पडले. यावेळी मुंबईतील रिसेप्शनसाठी अवघं बॉलिवूड एकत्र जमलं होतं. सर्वांनी दीपिका-रणवीरच्या वेडिंग पार्टीत धम्माल केली. दीप-वीरसुध्दा आपल्या इंडस्ट्रीतल्या मित्रांसोबत प्रचंड खुश दिसत होते.

दीपिका-रणवीरच्या या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यात अनेक फोटोग्राफर्स आणि व्हिडीओ जर्नलिस्टची मांदियाळी जमली होती. हे नवविवाहित दाम्पत्यसुध्दा एकदम हसतमुख आणि मस्ती अंदाजात जमलेल्या सर्वांना मनोसोक्त फोटो काढून देत होते. यावेळेस एक मजेशीर किस्सा घडला. आपल्या कॅमे-यात दीप-वीरचा लूक कैद करण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागली होती. तेव्हा दीपिकाने आपल्या कॅमे-यात पाहावं म्हणून ऐका फोटोग्राफरने तिला भाभी अशा हाक मारली आणि एकच हास्याचे पवारे उडाले. मग दीपिका लटक्या रागात त्यांना म्हणाली भाभी मत कहो, प्लीज. दीपिकाची ही लाडिक विनंती मान्य करत तेथील मराठी फोटोग्राफर्स तिला चक्क मराठीत वहिनी...वहिनी अशी हाक मारु लागले.

https://twitter.com/twitter/statuses/1068992017412382721

त्यामुळे दीप-वीरचं रिसेप्शन म्हणजे धमाकेदार ठरलं यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive