ट्रोलर्सच्या रडारवर नवी नवरी प्रियांका..... लग्नसोहळ्यात प्राण्यांचा छळ

By  
on  

बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाहसोहळा अलीकडेच पार पडला. परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत देशी रितीरिवाजाने हा लग्नसोहळ्यात सोहळा अविस्मर्णीय ठरला. पण या सोहळ्याला वादाचं गालबोट लागलं आहे.

प्रियांकाने पाहुण्यांना एअरपोर्टपासून उमेद भवनपर्यंत आणण्यासाठी चॉपरची सोय केली होती. पण मुख्य पाहुण्यांना लग्नाच्या ठिकाणी आणण्यासाठी हत्ती आणि घोड्यांचा वापर केला गेला. या प्रकाराबद्दल प्राण्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या 'पेटा' या संस्थेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पेटाने ट्वीट करुन नाराजी जाहीर केली आहे. पेटा ट्विट मध्ये म्हणते, ' हल्ली अनेकजण जनावरांच्या पाठीवर बसून करण्यात येणारी सफारीही नाकारतात, लग्नसोहळ्यांमध्येही घोड्यांचा वापर टाळतात. तुम्हाला या खास दिवसाचा अपार आनंद असेल; पण प्राणीमात्रांसाठी आजचा हा दिवस नक्कीच चांगला नाही'. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा जपण्यासाठी कमालीची सजग असलेली प्रियांका या ट्विटला काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

https://twitter.com/PetaIndia/status/1069475968199393280

प्रियांका ट्रोल होण्याचा हा सिलसिला इथेच थांबत नाही. लग्नाच्या दिवशी जोधपूरमध्ये केलेल्या आतिषबाजीमुळे प्रियांकाची ट्रोलर्सनी खिल्ली उडवली. मुळात अस्थमाने ग्रस्त असलेल्या प्रियांकाला इतक्या फटाक्यांचा त्रास कसा झाला नाही असा प्रश्न बऱ्याच ट्रोलर्सनी विचारले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीचं दिवाळीच्या काही दिवस आधी प्रियांकाचा एक विडिओ व्हायरल झाला होता. त्यात प्रियांकाने सगळ्यांना फटाके न उडवण्याचं आव्हान केलं होतं. पण लग्नातल्या आतिषबाजी मुळे ट्रोल होण्याची वेळ मात्र तिच्यावर आली आहे.

यावर प्रियांकाची काय प्रतिक्रिया असेल हे लवकरच कळून येईल. प्रियांकाची स्थिती म्हणजे 'दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' अशी झाली आहे. तिचा विवाहसोहळा उरकून काही दिवस झाले आहेत. प्रियांकाचं दिल्लीमध्ये आज  रिसेप्शन असणार आहे. त्यासाठी नवं जोडपं आणि वऱ्हाडी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

Tags

Recommended

Loading...
Share