प्रियांका-निकच्या रिसेप्शला पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास उपस्थिती

By  
on  

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास यांच्या उमेद भवनयेथील स्वप्नवत ठराव्या अशा लग्नसोहळ्यानंतर काल दिल्लीत त्यांचं ग्रॅंण्ड रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शनसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती.

दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये पार पडलेल्या रिसेप्शनसाठी प्रियांकाचे कुटुंबिय आणि मित्र-मंडळी यांना निमंत्रण होते.

शाही पध्दतीने उमेद भवनमध्ये निक आणि प्रियांकाने आयुष्यभरासाठी एकेमकांचे झाल्याच्या आणाभाका घेतल्या. यावेळी फक्त निक आणि प्रियांकाचे जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. १ डिसेंबर रोजी हे दोघे ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. तर रविवारी २ डिसेंबर रोजी पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह संपन्न झाला.

 

 

 

प्रियंका-निकचा उमेद भवनातील संगीत सोहळा एखाद्या रंगारंग ग्रॅण्ड सोहळ्यासारखाच होता. प्रियंका आणि निक दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांनी एकापेक्षा एक बहारदार परफॉर्मन्स देत प्रियंका निकचा हा सोहळा अविस्मरणीय केला.

Tags

Recommended

Loading...
Share