तसं बघायला गेलं तर सारा अली खान आणि करिना कपूर खान ह्या दोघींचं नातं सावत्र आई-मुलीचं. पण बॉलिवूडमध्ये असूनही त्याच्यांत ना कधी वाद किंवा कसली इर्षा अथवा स्पर्धा असल्याचं जाणवलं. दोघीही कौटुंबिकअसो किंवा इतर पार्टी व कार्यक्रमांमध्ये एकदम सहज वावरताना पाहायला मिळतात. हे नातं नाजूक आहे. त्यांच्यात घट्ट मैत्रिणींचं नातं नसलं तरी हे कोणत्याही मैत्रीपेक्षा कमीसुध्दा नाहीय आणि यांच्यातला महत्त्वाचा दुवा ठरतो आहे तो सैफ अली खान.
सारा अली खानने नुकतंच केदारनाथ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एक होतकरु अभिनेत्री म्हणून सध्या सारावर चोहोबाजूंनी या सिनेमानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केदारनाथमधील तिच्या अभिनयाने इम्प्रेस होत तिची सावत्र आई करिना कपूर चक्क तिच्यासाठी एक जंगी पार्टी देणार असल्याचं वृत्त आहे. एवढंच नव्हे तर खास सारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीची सर्व तयारी आणि नियोजन खुद्द करिनाच करणार असल्याचं बोललं जात आहे. ही पार्टी पुढील आठवड्यात करिना देणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबो ही पार्टी फारच खाजगी स्वरुपात देणार असल्याने यात फक्त सैफ आणि तिचे जवळचे मित्र-मैत्रिणी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. करिना व सैफच्या घरी सारासाठी ही पार्टी आयोजित करण्यात येणार आहे.
करिनाला विश्वास आहे, की ज्याप्रकारे सारा आपले सिनेमे निवडते आणि त्यानुसार त्यासाठी लागणारी तयारी करतेय यामुळे ती लवकरच बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाईल. केदारनाथप्रमाणेच करिना तिचया सिंबा सिनेमावरही प्रचंड खुश आहे.